निवृत्तीनाथ,ज्ञानदादा,सोपानदादांना ‌मुक्ताईने बांधली राखी

0

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : राखी पौर्णिमेच्या शुभ‌महूर्तावर बहिण मुक्ताबाई कडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री‌संत मुक्ताबाई संस्थान कोथळी – मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली.

सविस्तर असे की, दरवर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याचा पारंपरिक उत्सव असल्याने श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर संस्थानाने‌ आजही ही परंपरा जोपासली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बहीण संत मुक्ताई कडून दादा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर ,संत सोपानदेव तिन्ही बंधूचे गावी मुक्ताई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी आज राखी पौर्णिमेच्या सणाला खास प्रतिनिधी पाठवून कोरोना काळात सुध्दा परंपरा कायम राखली.

त्र्यंबकेश्वर येथे संदिप दादा पाटील यांनी सपत्नीक जेष्ठबंधू श्री संत निवृत्तीनाथांकडे राखी प्रदान केली.संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान अध्यक्ष पवनसेठ भुतडा, पुजारी ह.भ.प.जयंतमहाराज गोसावी,विश्वस्त ह.भ.प.संजयनाना महाराज यांची उपस्थिती होती.

आळंदी येथे आज सकाळी माऊली ज्ञानदादांना मुक्ताई कडील राखी रुमाल टोपी ह.भ.प.विचारसागर महाराज लाहूडकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख अँड. विकास‌ ढगे ,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सोपविली. मुक्ताईचे लहान बंधू सोपानदादांना सासवड येथे जावून विजय महाले यांनी मुक्ताईकडील राखी बांधली यावेळी पुजारी हिरूकाका गोसावी चोपदार हरिभाऊ यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.