निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी सैन्यात दाखल होणार ?

0

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच आता तो निवृत्तीनंतर काय करेल याचे वेगवेगळे कयास लावण्यात येत आहेत. सुरूवातीला धोनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, आता यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे धोनी निवृत्तीनंतर सैन्यात दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. सियाचिनच्या दुर्गम भागात पोस्टिंग मिळून देशसेवा करण्याची धोनीची इच्छा असल्याचे त्याच्या एका मित्राने म्हटले आहे.

विश्‍वचषकात महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर टीका केली आहे. धोनीने संथगतीने फलंदाजी केल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. त्यात त्याच्या फिटनेसविषयीदेखील टीका करत तो आता निवृत्ती घ्यावी असेदेखील अनेकांनी म्हटले आहे. या सर्व चर्चांमध्ये धोनीला देशसेवा करण्याची इच्छा असून तो सैन्यात दाखल होवू शकतो असे धोनीच्या जवळच्या मित्राने म्हटले आहे. धोनीने संपुर्ण विश्‍वचषकाच्या 8 सामन्या 273 धावा केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.