राज्य सरकारची नियुक्ती प्रक्रिया रेंगाळली; लक्ष घालण्याची केली मागणी
चोपडा (रमेश जे.पाटील)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 650 पदांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल मार्च 2019 महिन्यात जाहीर झाला होता परंतु यशस्वी उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र मिळाले नसल्याने उमेदवार आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकसेवा आयोगाकडून सहाशे पन्नास हजार पदांसाठी जुलै 2017 मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात आली .मात्र अद्यापही त्या पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र प्राप्त न झाल्याने त्याचा आनंदात आता विरजण पडल्यासमान आहे.
एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल मार्च 2019 मध्ये जाहीर झाला. यानंतर यशस्वी उमेदवारांच्या संबंधित गावात भावी फौजदार म्हणून जल्लोषी मिरवणुका काढण्यात आल्या, कुठे आनंद साजरा करण्यात आला, कुठे पेढे वाटण्यात आले ,तर कुठे बैनरबाजी करून त्याचे गुणवत्तेचा गौरव करण्यात आला होता.मात्र त्या नंतर त्या 650 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळणार कधी असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होऊ लागला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी 2017 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. अंतिम परीक्षेचा निकाल तब्बल दोन वर्षांनी म्हणजे 8 मार्च 2019 रोजी जाहीर झाला होता. यामध्ये 650 उमेदवारांची भावी फौजदार म्हणून निवड झालेली आहे.हे निवड झालेले बहुतांश उमेदवार ग्रामीण भागात राहतात त्यामुळे निवडीनंतर ग्रामस्थांनाही त्यांच्या जल्लोषी मिरवणुका काढल्या व पालकांनी बार उडवून लग्न देखील जमवले होते,यामध्ये मुलांसोबत मुलीचा देखील मोठा सहभाग असून त्यांना नियुकी पत्र न मिळाल्याने राज्य सरकारने याकडे त्वरित लक्ष घालुन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
यातील बहुतांश सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांच्या पालकांनी त्यांना उसनवारी करून शिकवले आहे यामुळे बहुतेक कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी दिसून येत आहे .आता पोरगा पोरगा झाला म्हटल्यावर या कुटुंबांना दिलासा मिळाला होता व परमोच्च आनंद झाला होता पण अजूनही याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने ते परिवार अस्वस्थ झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जुलै 2017 मध्ये मुख्य परीक्षा झाली, यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये शारीरिक चाचणी व मुलाखत प्रकिया पूर्ण झाली त्यानंतर आठ मार्च 2019 रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल झाला परंतु अद्याप रिक्त पत्र मिळाले नाहीत.
जळगाव धुळे जिल्हयातील 45 विद्यार्थी पात्र
राज्यातील 650 यशस्वी मुलांमध्ये जळगाव व धुळे जिल्हयातील एकूण 45 मुलाचा सहभाग असून यात निम्मेच्या जवळपास मुलींनी या परीक्षेत बाजी मारली होती.आणि त्यातही अत्यंत गरिबीतून मुले व मुलींनी खडतर परिश्रम घेऊन ही परीक्षा पास झाले असून त्यांना देखील आता नियुक्तीपत्र मिळावे म्हणून अधिवेशन काळात सरकारच्या निर्णयाकडे लक्ष घालून आहेत.