मुंबई- निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ते पाऊल उचलण्यात आले. निरूपम यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.
मागील आठवड्यात निरूपम यांची उत्तरप्रदेशातील वाराणसी या मोदींच्या मतदारसंघात सभा झाली. त्यावेळी बोलताना निरूपम म्हणाले, मोदींच्या निर्देशावरून वाराणसीत कॉरीडॉरच्या नावाखाली अनेक मंदिरे पाडण्यात आली. त्यामुळे मोदींच्या रूपाने जनतेने आधुनिक काळातील औरंगजेबालाच निवडून दिले आहे. दरम्यान, निरूपम यांच्या त्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. प्रथमदर्शनी ते वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.