निवडणूक अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती

0

जळगाव : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ अ मधील पाेटनिवडणुकीसाठी निवडणूक अायाेगाने निवडणूक निर्णय अधिकारीपदी विशेष भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती केली अाहे.

पाेटनिवडणुकीसंदर्भात उपजिल्हाधिकारी वाघ यांनी साेमवारी बैठक घेऊन अाढावा घेतला. वाघ यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुभाष दळवी व प्रभाग अधिकारी एस. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. तर खर्चाच्या हिशाेबासाठी लेखाधिकारी म्हणून पालिकेचे मुख्य लेखापरीक्षक संताेष वाहुळे यांची नियुक्ती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.