निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथसंचलंन

0

भुसावळ  | प्रतिनिधी
सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता शहरात आज दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस विभागातर्फे पथसंचलंन करण्यात आले .
स्थानिक शहर पोलीस हद्दीमधून उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर वाहतूक शाखा निरीक्षक दिपक गांधाले, पीएसआय धारवड, यांच्यासह पोलीस अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी पथक यांचा समावेश होता. शहरातील आठवडे बाजार, सराफ बाजार, मॉर्डन रोड मार्गे रजा टॉवर, अमरदीप टॉकीज, आंबेडकर चौक यामार्गावर पथसंचलन करण्यात आले. बजारपेठ पो.स्टे. समोर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.