भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ परिसरातील यावल रोडवर रस्त्यातील खड्डे बुजवुन, निवडणुकीच्या तोंडावर रस्ता बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, इतर ठिकाणी चौकाचौकात रस्त्यांची सुधारणा व्हावी. स्वच्छता राहावी यासाठी स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सय्यद सादिक अली यांनी दिली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोका पाहून चौका मारण्यास पी डब्ल्यू आय खात्याने खड्डेमय रस्ते सुधरवीण्यासाठी रस्त्यांची कामे यावल रोडवर सुरू केलेली आहेत .कुंभकर्णी झोपेतून अचानक जागे होऊन पी डब्ल्यू आय खात्यानं,रस्ते सुधरविण्याचा घाट घातलेला आहे .त्यामुळे उशिराने का होईना नागरिकांच्या समस्यांची जाणीव झाल्याने, सामाजिक कार्यकर्ते सय्यद सादीक अली यांनी खुश होऊन,पि डब्लू आय खात्यास धन्यवाद देऊन, “स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत अभियानात” सहभाग घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले . यावलरोडवर रस्त्यांचे काम सुरू असल्याने ,पादचारी वाहनचालकांची इडापिडा थोड्याफार प्रमाणात का होईना टळणार आहे.