निलेश देशमुख व अमोल पाटील यांची खामगाव महावितरणला भेट

0

खामगाव : ‘स्वाभिमानी’चे निलेश देशमुख अमोल पाटील यांनी आज (२६फेब्रु.२०२१)  खामगाव महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.जायभाये साहेब यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा करुन. या काळात कोणत्याही ग्राहकाचे विज कनेक्शन कापु नये त.. ..! असे निलेश देशमुख अमोल पाटील यांनी ठणकावून सांगितले..

 

महावितरणने सध्या विज कनेक्शन कापायचा सपाट लावला आहे. लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे. उर्जामंत्र्यांनी पहिले विजबिल माफीचे सूतोवाच केले व नंतर घूमजाव केला आणि आता जबरदस्ती वसुली सुरू आहे. असे निलेश देशमुख यावेळी म्हणाले..

 

विज कनेक्शन कापायला अधिकारी – कर्मचारी आला तर ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा..असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले व जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील ‘त्या’ कर्मचारी – अधिकाऱ्यास ‘स्वाभिमानी’ स्टाईलने धडा शिकवू..! व मा  रविकांतभाऊं  तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली  धडा शिकवु असा इशाराही निलेश देशमुख यांनी यावेळी दिला..

 

..यावेळी उपस्थित अमोल पाटील जिल्हा उपाध्यक्ष, निलेश देशमुख विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष, निलेश गवळी सोशल मीडिया तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.