निलेश देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

0

खामगाव (प्रतिनिधी) तालुक्यामध्ये दि २१ रोजी अवकाळी पावसासह गारपिटीने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने गहू,हरभरा,कांदा,लिंबू,भाजीपाला आदी पिकाचे ला खो रुपयांचे नुकसान झाले आहे,तर या आधी खरीप पिकाचे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता तसेच कोरोना लॉक डाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला पडेल दर मिळाला मात्र इतर वस्तूंचे दर आकाशाला जाऊन भिडले याचा फटका शेतकऱ्यांसह छोटे व्यवसायिक, शेतमजूर,शेतकरी यांना बसला बसत आहे.

त्यामुळे तालुक्यातील शेतकरी विविध आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासना कडून आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने निलेश देशमुख स्वाभिमानी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा  यांनी खामगाव तालुक्यातील दिवठाणा, रोहणा, पि राजा,सह विविध गावशिवारातील नुकसान पिकाची पाहणी दि २१ रोजी केली.आधीच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या वक्रदृष्टीने अवकृपा करीत दि २० रोजी अवकाळी पावसास ह गारपिटीने दमदार हजेरी लावून खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटामध्ये टाकले,त्यामुळे शेतकऱ्यां समोर विविध समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे,राज्यशासनाने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी केली त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता आले.

सदर कर्ज फेडण्याच्या तयारीमध्ये शेतकरी असतांना गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले त्यामुळे सोसायटी,बँका आदींचे कर्ज शेतकरी कसा फेडले कर्जच फेडले नाही तर नव्याने कर्ज मिळणे कठीण होईल त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार करून निलेश देशमुख यांनी दिवठाणा, रोहणा, पि राजा,आदी गावातील नुकसान पिकाची पाहणी दि २१ रोजी केली.यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी कसा आर्थिक संकटामध्ये आहे हे सांगून शासनाकडे आमच्या शेतपिकाच्या नुकसानीची बाजू मांडून शासना कडून एकरी ५०,००० रुपयांची मागणी करावी अशी विनंती केली असता स्वाभिमानी चे निलेश देशमुख यांनी शेतकऱ्यांना धीर देत सदर बाब राज्यशासनाकडे तात्काळ मांडून आर्थिक मदती करिता विनंती करणार असल्याचे सांगितले.

यावेळी, शुभम गावंडे, निलेश गवळी तालुका अध्यक्ष सोशल मीडिया, गिरीधर वाकुडकर, अतुल पाटील, मंगेश वाकुडकर,सजय टिकार, सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.