Saturday, December 3, 2022

निर्मल सीड्सतर्फे 500 कुटुंबांसाठी होमिओपॅथी औषधीचे वाटप

- Advertisement -

 पाचोरा |प्रतिनिधी

- Advertisement -

जगभर थैमान घातलेल्या (कोविड – 19) कोरोना विषाणूच्या युद्धात आपण सर्व सहभागी होऊन सामूहिकपणे लढा देत आहोत. कोरोना विषाणूला हरविणे हे आपले अंतिम लक्ष असून त्यादृष्टीने आपले सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत. निर्मल सिड्स चा प्रत्येक कर्मचारी हा निर्मल परिवारातील घटक असून निर्मल सीड्स सदैव कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच कोरोनाच्या या गंभीर काळात कंपनीने यापूर्वी सर्व कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात सॅनीटायझर्स आणि मास्कचे वितरण केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा धोका लक्षात घेऊन निर्मल सिड्सने सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची काळजी म्हणून सुमारे 500 कुटुंबांना “आर्सेनिक अल्बम 30“ या होमिओपॅथी औषधीचे  वितरण करून कार्पोरेट क्षेत्रात सामाजिकतेचा आदर्श घालून दिला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच निर्मल सिड्सने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 15 लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 18 लाख रुपयांची भरभरून मदत केली आहे. त्याचबरोबर पाचोरा व भडगाव शहरातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासकिय यंत्रणा तसेच पाचोरा शहरातील सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकार बांधवांना तसेच पाचोरा बसस्थानकातील सर्व वाहक व चालक बांधवांना मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर्स आणि मास्क चे वितरण केले आहे. त्याचबरोबर पाचोरा शहरात तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, रुग्णालय यातील सर्व कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाच निर्जंतुकीकरण कक्ष चे ही वितरण केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या