पाचोरा | प्रतिनिधी
निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणात सकाळच्या सत्रात जागतिक योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रथमतः निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन योगाभ्यासाला सुरुवात झाली. योगाचार्य एस. एस. पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची योगासने व प्राणायाम यांचा सराव केला. याप्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उपप्राचार्य गणेश राजपुत, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योगशिबीर यशस्वीतेसाठी शाळेतील लक्ष्मी पाटील व सर्व क्रिडा शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.