निर्मल इंटरनॅशनल स्कुलमधील विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार

0
 पाचोरा  प्रतिनिधी
     येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलमधील पाचोरा, शेंदुर्णी, नगरदेवळा, उत्राण या पुर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या नवीन जागेत कै. आर. ओ. (तात्या) पाटील नगर, पुनगाव रोड, पाचोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन “निर्मल उत्सव” अतिशय दिमाखदार पध्दतीने सादर केला. संमेलनाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेस माल्यार्पन करुन झाली. बाल – गोपालांनी सादर केलेला नृत्याविष्कार पासुन उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता.  यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन शाळेतल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व नवीन इमारतीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कोणकोणते नवीन उपक्रम सुरु करण्यात येतील याबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, निर्मल सीड्सचे सर्व पदाधिकारी, शाळेचे शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य मंजु शर्मा, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, गणेश राजपुत, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.