निर्मला सितारामन ३ एप्रिलपासून रशियाच्या दौऱ्यावर

0
नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सातव्या मॉस्को संमेलनात सहभागी होण्यासाठी येत्या मंगळवारपासून अर्थात ३ एप्रिलपासून रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच रशिया दौरा असणार आहे.
सितारामन या ३ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या रशियाचे संरक्षणमंत्री आर्मी जनरल सेर्गेई शोईगू आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. भारत आणि रशिया या दोन देशांमधील पारंपरिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या दौऱ्यामुळं उभय देशांमधील पारंपरिक मैत्री, विशेषतः लष्करी तंत्रज्ञानातील सहकार्याचे संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.