निर्भया प्रकरण ; मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाने याचिका फेटाळली

0
20

नवी दिल्लीः सामूहिक बलात्कार करुन हत्या करणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात मुकेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, आज न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दोषी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेश याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका का फेटाळली याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुकेशकडून वकील अंजना प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशने याचिकेतून केला होता. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंहची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्याला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीची कोणती तारीख निश्चित केली आहे? डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का?, असे प्रश्न सुप्रीम कोर्टाकडून तिहार कारागृहाला विचारण्यात आले असून त्यावर कारागृह प्रशासन आज उत्तर देणार आहे.

निर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश, अक्षय, पवन आणि विनय यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here