नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची अल्पवयीन असल्याची याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
जेव्हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होतो त्यामुळे फाशी देऊ नये अशी याचिका पवन कुमारने केली होती. ‘तुम्ही अशा प्रकारे अर्ज करत राहाल तर प्रक्रिया अंतहीन होईल,’ अशी टिप्पणी करत कोर्टाने याचिका फेटाळून लावली. निर्भया बलात्कार प्रकरणात ४ आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी चारही दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला आहे.