निर्भयाच्या गुन्हेगारांना उद्या फाशी ; सर्व पर्याय संपले

0

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्त्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. त्यामुळे दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना उद्या २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फासावर लटवण्यात येणार आहे

तत्पूर्वी या प्रकरणातील तीन दोषींना त्यांचे कुटुंबीय शेवटचे भेटले आहेत. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची दोषींशी एका बंद खोलीत भेट घडवून आणली गेली. मात्र, चौथा दोषी अक्षय याचे कुटुंबीय त्याला अद्याप भेटलेले नाहीत. दरम्यान, चौघांना फाशी देण्यासाठी तिहार तुरुंगात सर्व तयारी झाली आहे. फाशी देणारा जल्लाद पवनही दोन दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगात दाखल झाला होता. यानंतर फाशी देण्याची तालीमही झाली होती. त्यानुसार आता उद्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.

दरम्यान, दोषी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज सुरु ठेवले जाऊ शकते. निर्णय येण्यासाठी रात्र होऊ शकते. पण दोषींसमोरील सर्व पर्याय संपले असल्याने फाशी रद्द होणे अशक्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.