फैजपूर :- धनाजी नाना महाविद्यालयात आज जागतिक योगदिनानिमित्त सन महोत्सव समितीतर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. प्रास्तविक -डॉ.आय.पी.ठाकुर यांनी केले. त्यात त्यांनी योगदिवस साजरा करण्यामागिल भूमिका मांडली .मा.प्राचार्य यांनी शारीरिक ,मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग प्रत्येकाला आवश्यक आहे .त्यासाठी संत कबिर यांचे जीवन व कार्याची ओळख हिंदी विभाग प्रमुख डाॕ.कल्पना पाटील यांनी करून दिली.कबिरांचे दोहे आजही जनमानसांच्या जीवनासाठी कसे प्रेरणादायी आहेत हे विविध उदाहरणे देऊन प्रभावी पणे श्रोत्यांना पटवून दिले.
लोकसेवक बाळासाहेब मधूकरराव चौधरी यांचे शैक्षणिक कार्य व एक आदर्श गांधीवादी नेते होते त्यांनी २९ वर्षे रावेर यावल मतदारसंघाची निस्वार्थ सेवा केली याबद्दल आढावा आध्यक्षिय समारोप करताना उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे यांनी मांडले. आभार प्रदर्शन ग्रंथपाल सहाय्यक व्ही.एस .सिसोदे यांनी मानले सूत्रसंचालन -श्रीमती यमू नेमाडे यांनी केले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व ग्रंथालयातील कर्मचारी व सन महोत्सव समिती प्रमुख सदस्य डाॅ .दीपक सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले .