भुसावळ (प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेसाठी महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू शिथिल करून सकाळी १० ते ७ ही वेळ सूट दिली आहे. मात्र या शिथिलतेचा(सूट) काही मंडळी गैरफायदा घेत असून नाईलाजाने पोलिस विभागाला नियम तोडणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू ठेवावी लागणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी सांगितले.
नागरिक दिलेल्या सुटचा फायदा घेत असून चारचाकी वाहनात चालक व सोबत एक व्यक्ती तर दुचाकीवर फक्त वाहन चालक हे एकटे राहतील हे आदेश आहे.मात्र वाहनधारक नियम मोडत असल्याने केवळ बाजारपेठ पोलिस पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० वाहने जप्त करण्यात आली आहे.तर ३० ते ४० जणांविरूध्द कलम १८८ नुसार कारवाई केली आहे.मिठाई व फरसाण दुकानांना शिथिल केलेली सूट जिल्हाधिकारी यांनी रद्द केली आहे.अत्यावश्यक कामासाठी दिलेल्या सूट मध्ये काही लोक विनाकारण फिरत असल्याने ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचाही इशारा राठोड यांनी दिला आहे.