नियमित धावणाऱ्या प्रवासी गाडया 12 ऑगष्टपर्यंत रद्द

0

भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार होणारे दुष्परिणाम लक्षात घेता दिनांक – 12 ऑगस्ट 2020 पर्यंत भारतीय रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणतीही प्रवासी गाडी प्रारंभीच्या स्थानकावरून धावणार नसल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे.

जसे की प्रवासी गाडी, मेल एक्स्प्रेस, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाइन, दुरंतो एक्सप्रेस, पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भुसावळ विभागातून कोणतीही प्रवासी गाडी धावणार नाहीत. माल गाड़ी व विशेष पार्सल गाड्या फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी कार्यरत असतील. दिनांक ०१ जून २०२० पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष प्रवासी गाडी सेवा या चालू राहणार आहे.

प्रवाश्यांनी प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्या पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांची तिकिटे रद्द करण्यासाठी आरक्षण कार्यालय मध्ये आरक्षित तिकिटे सादर करु शकतात. आरक्षण कार्यालय सुरू झाले की प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याची घाई करू नये कारण त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि त्याचा आरोग्य वर परिणाम होऊ शकतो. आरक्षण चा परतावा हा सुरक्षित आहे आणि तो 6 महिन्या पर्यंत मिळणार आहे. ऑनलाइन तिकीट धारकां चे तिकीट हे ऑनलाइन तिकीट रद्द करावे लागेल आणि परतावा हा बँक खात्यात जमा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.