पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता सर्व नागरिकांनी खबरदारी बाळगणे, मास्क वापरणे व सोशल डीस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज दि .१४ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार मास्क न वापरणारे, सोशल डीस्टंसिंगचे पालन न करणारे व इतर नियमांचे
पालन न करणार्या नागरिकांवर पारोळा न.पा.मार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन पारोळा नगर पालिका व प्रशासना मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती पारोळा नगर पालिकेचे मुख्यधिकारी विजय कुमार मुंडे यांनी प्रेस नोटव्दारे दिली आहे.

