नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी

0

अमळनेर (प्रतिनिधी):-भारतीय साथरोग अधिनियम, १८९७ अन्वये दिनांक १२ मे, २०२१ अन्वये संपूर्ण जळगांव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निबंध दिनांक १ जून, २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपावेतो वाढविण्याचा दिनांक २२ एप्रिल, २०२१ व दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजीचा आदेशाचे निर्बंधासह आदेश पारीत करण्यात आलेला आहे.

संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील दैनिक वृत्तपत्रे, व्हाटस अॅप, फेसबुक, यू ट्यूब चॅनल मधील फाटोंसह बातम्या पाहिल्यावर विवाह समारंभ, राजकीय बैठका, राजकीय पक्षांची निवेदने, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे निवेदने आंदोलने सर्रास उल्लंघन करीत आहेत. जिल्ह्यात संचार बंदी लागू आहे (संदर्भ क्र. १) तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश (संदर्भ क्र. २) असतांनाही काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढून तिसरी लाट येण्याची तज्ञांच्या सुचनेनुसार शक्यता नाकारता येत नाही एकीकडे सामान्य जनतेवर कारवाईचा प्रहार होत असतांना शासकीय, राजकीय व्यक्तींकडून नियमभंग होत आहेत वृत्तपत्रातील फोटोंसह बातम्या, सोशल मिडीयावरील फोटो आदि शोशल डिस्टनसींन पाळल्यामुळे ते पुरावे ग्राह्य धरुन उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कठोरकारवाई करण्यात यावी असेही माजी आमदार साहेबराव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.