नवी दिल्ली – भारत सरकारने आजपासून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरच्या एलओसीवर व्यापारी मार्गातून पाकिस्तान गैरवापर करत असल्याचं अहवाल आल्यानंतर केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानकडून अवैधरीत्या हत्यारे, अमली पदार्थ आणि बनावट नोटा भारतात आणण्याला चाप बसणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी यासंबंधीचा आदेश दिला. त्यामुळे आजपासून हा नियंत्रण रेषेवरुन सुरु असलेला व्यापार बंद करण्यात येणार आहे. या व्यापाराच्या माध्यमातून पाकिस्तान अवैधरीत्या बनावट नोटा, हत्यारं, अमली पदार्थ भारतात पाठवत होतं. गुप्तचर यंत्रणेकडून अशाप्रकारचा अहवाल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला प्राप्त झाला. त्यानंतर हा आदेश भारत सरकारकडून घेण्यात आला आहे.