निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे येथे गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे शेतकरी वर्गाला पिक परिस्थितीबाबत मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे गावातील भंडारा उत्सव समितीने आज दि.२६ जून रोजी सकाळी ८ वाजता गावातील सर्व ग्रामदेवतांची पुजा अर्चा करून निंबू अंडे बाकोळा नैवेद्य देवून मरीआईला भंडारा साजरा केला.
पाऊस यावा यासाठी मरी मातेला साकळे घालण्यात आले गेल्या दहा-बारा वर्षांपासून भंडारा उत्सव समिती अंध श्रद्धा मोडून म्हणजेच कुठल्याही भगत भक्तीणीला न घुमवता साध्या पध्दतीने मरी आईचा भंडारा साजरा करत आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती एरंडोल तालूका कमिटी कडून स्वागत करुन कौतुक केले होते.
यावेळी भंडारा साजरा करण्यासाठी उत्सव समितीचे नागराज चिंधू पाटील, कौतिक पितांबर पाटील, रामचंद्र महादू हटकर, प्रकाश धना कुंभार, आधार गिरधर माळी, मोतीराम चिंतामण पाटील, चंद्रभानपाटील लक्ष्मण पाटील, गोरख भिवसन पाटील आदी ग्रामस्थांचे विषेश सहकार्य लाभले.

