निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉक डाउन केल्यामुळे मानवासह देव देवतांनाही बंदी आदेश पाळावा लागला. दि,5 ऑगस्ट रोजी अयोध्ये येथील राम मंदीराचे भुमीपुजन असल्याने आज दिवसभरासाठी गावा गावातील श्रीराम मंदिरे उघडण्यात आली.
यावेळी श्रीराम मंदिराचे पुजारी गणेश महाराज यांनी श्रीराम व हनुमान मंदिरावर जावून शास्त्रोक्त पूजा पाठ केली. यावेळी पोलीस पाटील, भागवत महादू हटकर, पत्रकार लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते पुजा पत्री करण्यात आली. त्यानंतर गावातील रामभक्त व हनुमान भक्त यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मंदीरात जाऊन दर्शन घेतले यावेळी. पोलीस पाटील भागवत हटकर, पत्रकार लक्ष्मण पाटील, रत्नाताई हेडा, दिपाली निपाणकर, रविंद्र हेडा, जितेंद्र पाटील, प्रमोद हटकर आदी गावातील भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.