निपाणे ग्रा.पं.ती वर फडकला शिवसेनेचे भगवा ; सरपंच पदी सुरेखा पाटील तर उपसरपंच पदी बाळू महाजन

0

निपाणे ता एरंडोल ( वार्ताहर) : 
निपाणे ग्राम पंचायती ची सरपंच उपसरपंच पदांची निवड दि,१७ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी आर पी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली
सरपंच पदी श्री संत हरीहर महाराज परीवर्तन पॅनलच्या तथा शिवसेनेच्या सुरेखा राजेंद्र पाटील तर उपसरपंच पदी बाळू सुभाष महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी शिवसेनेचे एरंडोल पं,समिती सभापती ‌अनिल महाजन माजी जि, प, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील तालूका उपप्रमुख संजय पाटील मुकूंदा पाटील यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच सर्व सत्ताधारी सदस्यांचा शाल श्रीफळ पुषपहार देवून सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना निर्वाचित सरपंच सुरेखा पाटील यांनी गाव विकासासाठी भरीव कामगिरी करण्याचे आश्वासन दिले
श्री संत हरीहर महाराज परीवर्तन पॅनलचे प्रमुख माजी सरपंच संजय तोताराम पाटील यांच्या पॅनलचे ९ पैकी ८ सदस्य निवडून आले असून तीनओ बी सी महिला सरपंच पदाच्या दावेदार तर ५ सदस्यांना उपसरपंच पदाचे दावेदार पॅनल प्रमुख संजय पाटील यांनी घोषीत केलेआहे.

यावेळी सरपंच पदाचा पहिला बहूमान सुरेखा राजेंद्र पाटील यांना मिळाला असून उपसरपंच पदाचा मान बाळू सुभाष महाजन यांना मिळून बिनविरोध निवड करण्यात आली सत्तेत असणार्या प्रत्येक सदस्याला पदाचा मान दिला जाईल असे आश्वासन पॅनल प्रमुख संजय पाटील यांनी जाहीर केल्यामुळे सरपंच उपसरपंच पदाची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी ग्रा ,प, सदस्य सौ,सुनिता हिंमत वराडे सौ, संगिता भिकन पाटील सौ, शालिनी शरद ठाकूर सौ,निलिमा समाधान ठाकूर विजय भास्कर सोनवणे सुरेश लक्ष्मण भिल ग्रामसेवक के डी मोरे आदी उपस्थित होते.

निवड प्रक्रिया बिनविरोध साठी पॅनल प्रमुख संजय तोताराम पाटील माजी सरपंच श्रीधर पाटील शरद ठाकूर राजेंद्र उत्तमराव पाटील प्रमोद बियाणी भिल्ल समाज सेनेचे अध्यक्ष रामा ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेे. नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे आ, चिमणराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.