निनादला ‘जय श्रीराम’ चा गजर!

0

शोभायात्रेने अवघे शहर दणाणले

जळगाव ;- ‘प्रभू श्री राम की जय’, ‘श्रीराम चंद्रांचा जयजयकार’अशा जयघोषांनी शनिवारी (दि.१४) शहरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या यामिरवणुकीत चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले. तसेच यावेळी श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक शिवाजी पुतळा, चित्र चौक टॉवर चौक भागात काढण्यात आली. भाविकांनी रामाच्या पादुका आणि रामसेतूचे दर्शन घेतले . महिलांचे ढोलताशा पथकही मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी रॅम सीता आणि लक्ष्मणाचा सजीव देखावा सादर करण्यात आला . रात्री उशिरापर्यंत शहरातून मिरवणूक निघाली होती.

चिमुकले राममंदिरात भाविकांची गर्दी 

रामजन्मोत्सवानिमीत्त शहरातील नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राममंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी दर्शनासाठी जनसागर उसळला होता. याठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आरती केली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जळगाव शहरात स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे एकत्रित भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अत्यंत आकर्षक शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

श्रीरामाचा महिमा

चिमुकले राम मंदिराचे पूजारी हभप दादा महाराज जोशी यांनी कीर्तनातून श्रीराम जन्मोत्सवाचा महिमा भाविकांना सांगितला. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम असून कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली.

 

मंत्र्यांनी हलविला श्रीरामाचा पाळणा

पोलीस मुख्यालय परिसरातील चिमुकले राममंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीराम जन्मोत्सव पाळण्याची दोरी हलऊन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांचे सोबत आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, नामदार गुरुमुख जगवानी यांच्यासह राजकीय पदाधिकारी यांनीही हजेरी लावली.

पोलिसांची दमछाक 

पोलिस मुख्यालय परिसरात चिमुकले राम मंदिर असल्याने दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहन पार्किंग करीत असल्याने वाहतुक शाखेच्या पोलीसांना वाहतुक सुरळीत करण्यासाठी भाविकांना वेळोवेळी सूचना द्याव्या लागत होत्या. मंदिराबाहेर वाहनांची गर्दी वाढत असल्याने पोलीसांचाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.