जळगाव ः- येथील निधी संजीवनी बहुउद्देशीय संस्था संचलित निधी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे जिल्हाधिकारी
कार्यालयात आज बुधवार,.28 रोजी सॅनिटरी पॅड वेडिंग मशिनचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, संस्थेच्या
अध्यक्षा वैशाली विसपूते व सचिव सुर्यकांत विसपूते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी-कर्मचारी तसेच त्या ठिकाणी दररोज येणार्या शेकडो महिलांना या नैसर्गिक समस्येसाठी मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन निधी फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे मशिन विनामुल्य लावण्यात आले आहे. फाऊंडेशनतर्फे स्वच्छतेतून सन्मान…सन्मानातून आत्मसन्मान या घोषवाक्यानुसार मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
मशिनचा शुभारंभ आस्थापना शाखेच्या श्रीदेवी भोपे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेखा चंदनकर, प्रिया देवळे, ममता पाटील, अनिता पाटील, प्रिती वाघुखार, परवीन तडवी, धनश्री संत, सुनंदा पाटील, लता माळी आदींसह 60 महिलां अधिकारी व कर्मचार्यांची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी हेमंत लोहार, यश विसपूते अ.भा.सुवर्णकार समाजाचे संजय विसपूते, अरुण वडनेरे, सुरेश सोनार, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती.