निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना वारसाला मदतीच्या ५० लाखाचा धनादेश

0

धरणगाव (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालय निवडणूक शाखेत कार्यरत दिवंगत कर्मचारी कै. अनिल हिवराळे हे कोरोना आजाराने मृत्यू पावल्यामुळे त्यांचा शासकीय अनुदानाचा प्रस्ताव तहसीलदार धरणगाव नितींकुमार देवरे व जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर करून आज दि. २५ मार्च रोजी त्यांना रुपये ५० लक्ष धनादेश देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष संजय गांधी, गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गणेश पवार, रवींद्र कंखरे, नगरसेवक पप्पू भावे, वासुदेव चौधरी यांच्या उपस्थितीत अनिल हिवराळे यांच्या वारस पत्नी प्रतिभा हिवराळे यांना धनादेश वितरित करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन उपस्थितांनी केले. सर्वांचे आभार तहसिलदार नितींकुमार देवरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.