निकालाआधी पंतप्रधान मोदी घेणार सरसंघचालकांची भेट?

0

नवी दिल्ली – सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार आहेत.

गेल्या चार वर्षात पंतप्रधान मोदींचा हा पहिला संघ मुख्यालयाचा दौरा असणार आहे. एनडीएची पूर्ण बहुमत मिळत नसल्यास संघ पंतप्रधान पदासाठी मोदींऐवजी इतर नेत्याचे नाव मांडण्याची शक्यता आहे. याच मुद्यांवरून नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. गेले अनेक दिवसांपासून मोदींनी संघातून काढता पाय घेतला होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.