निंभोरा येथे वर्ष अखेरच्या निमित्ताने स्मशान भूमी सफाई मोहीम

0

युवकांचा यशस्वी उपक्रम.

निंभोरा- ३१ डिसेंबर २०१९ या वर्षाअखेरच्या दिवशी सर्व दूर जल्लोषाचे वातावरण असतांना निंभोरा येथील युवकांनी मात्र  आगळावेगळा उपक्रम राबवित समज उपयोगी स्वच्छता अभियान राबविले.सर्वांनी मिळून येथील वाघोदा रस्त्यावरील स्मशान भूमीत सफाई अभियान राबविण्यात आले  यावेळी स्मशान भूमी परिसरात वाढलेले गवत, काटेरी झुडपे,अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांची छाटणी,कोरडा कचरा,पाने ,प्लास्टिक आदींची साफसफाई करीत स्वच्छता केली.यावेळी स्वानंद कृषी विज्ञान मंडळ,युवा रसिक मंडळ व युवाशक्ती मित्रपरिवाराचे कार्यकर्ते यांसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.या साफसफाई मुळे स्मशान भूमी परिसरात स्वच्छता दिसून आली.या उपक्रमाची दिवसभर चर्चा होऊन अनेकांनी कौतुक केले.

यांनी नोंदविला सहभाग-

यावेळी डॉ. एस डी चौधरी,प्रल्हाद बोंडे,मोहन बोंडे,शंकर सरोदे,योगेश कोळबे,सुनिल कोंडे,गुणवंत भंगाळे,सुधीर मोरे,गिरीश नेहेते,रवींद्र भोगे,सचिन चौधरी,मोहन भंगाळे, विवेक बोंडे,धीरज भंगाळे,विजय सोनार,संजय महाजन टेलर,बापूसाहेब रजाने,राकेश सपकाळे,हर्षल ठाकरे, चेतन महाले,वसीम शेख,योगेश सपकाळे,गिरीश सोनवणे,विजय चोपडे,निलेश भंगाळे, राहुल महाले,ललित दोडके,संजय आदिवाल,विनोद गोराडकर, यांसह आदी तरुण उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी स्मशान भूमी परिसरातील डेरेदार वृक्षांना रंग उपलब्ध करून देण्यात आला.

दशक्रियाविधीसाठी शेडची उभारणी गरजेची-

या स्मशान भूमीजवळ गावातील नागरिकांच्या  दशक्रिया विधीच्या सुविधेसाठी योग्य जागा ठरवून शेड ची ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.