निंभोरा येथे तरुणांच्या घोषणाबाजी व उत्साहात डॉ.उल्हास पाटील यांच्या रॅलीस प्रतिसाद

0

मुक्ताईनगर दि 17-
आज दि.16 रोजी मंगळवारी निंभोरा येथे कॉग्रेस-राष्ट्रवादी व सहयोगी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांची प्रचारफेरी तरुणांच्या उत्साहात व घोषणाबाजीत संपन्न झाली.यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार डॉ.उल्हास दादा पाटील,माजी आ.अरुण दादा पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, मसाका माजी संचालक चत्रभुज खाचणे,काँग्रेस चे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा नंदपाल डेअरीचे माजी चेअरमन कडू हरी भंगाळे,किसान सोसायटीचे माजी चेअरमन दगडू भारंबे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी,निंभोरा गणाचे पं स सदस्य दीपक भाऊ पाटील,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,रावेर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मायाताई बारी, शैलेंद्र राणे,किशोर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन दोडके, विकास सोसायटी चेअरमन मोहन बोंडे,गुणवंत भंगाळे,गिरीश नेहेते,रवींद्र भोगे,कैलास भंगाळे,नितीन भंगाळे,दिलीप खाचणे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संदीप खाचणे,चेतन भंगाळे,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुका उपाध्यक्ष शेख इकबाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रसाद पवार,राष्ट्रवादी युवकचे निखिल कोंडे,प्रशांत काठोके,अमजद खान,निलेश राठोड,अमर मेढे, किरण कोंडे,शुभम महाजन,पूर्वेश बोरसे,जयेश चौधरी, शेख अर्कम,चेतन महाले,व्यंकटेश बोरोले,सदीप सावकारे,गणेश खाचणे,धामोडीचे प्रशांत पाटील,राकेश सपकाळे यांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ श्रेष्ठ ,तरुण कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते.यावेळी निंभोरा परिसर घोषणाबाजी व तरुणांच्या उत्साहाने दणाणून गेला.
तरुणांनी डॉ.उल्हास पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला.रॅलीनंतर सर्व उपस्थित तरुणांचे व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी ओबीसी सेल चे रावेर तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी आभार मानले.सोबतच स्टेशन परिसरात महत्वाच्या भेटी घेत डॉ.उल्हास पाटील यांचा ताफा खिर्डी गावाकडे रवाना झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.