निंभोरा येथे ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

0

निंभोरा- आज निंभोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार यांच्या १२ डिसेंबर च्या वाढदिवसापासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष व प स सदस्य दिपक पाटील यांच्या पुढाकाराने निंभोरा-तांदलवाडी जिप गटातील १९गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले .

त्याचा गोड शेवट आज निंभोरा येथे संपन्न झाला.यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंभोरा गावातील सहकारातील ज्येष्ठ मार्गदर्शक नरेंद्र तात्या पाटील हे होते. तर कार्यक्रमास  राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,मससाका चे माजी संचालक चत्रभुज खाचणे, सुरेंद्र नेहेते,डॉ एस डी चौधरी,माजी सैनिक सुधाकर सोनवणे,चिंतामण राणे,शाइब्राव चौधरी सर,प्रल्हाद बोरोले,विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे,दत्तात्रय पवार,पितांबर भिरुड,काशीनाथ शेलोडे,।निंबाजीराव पवार,मधुकर पवार,वसंत भोगे,रमेश नेहेते,सीताराम बोरणारे, भगवान बोरणारे, शेख इकबाल,रहीम खान,मुरलीधर कोळी,संतोष चौधरी,शंकर बोरोले यांसह गावातील असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा रुमाल,टोपी व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी चत्रभुज खाचने, डॉ एस डी चौधरी,सुरेंद्र नेहेते,प्रल्हाद बोंडे,प स सदस्य दीपक पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन सुनील कोंडे यांनी तर आभार हर्षल ठाकरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.