Saturday, October 1, 2022

निंभोरा येथे कै. गिरधर भंगाळे यांना अभिवादन

निंभोरा- येथील सहकार महर्षी तथा निंभोरा गावात  शेतकऱ्यांशी संबंधित विविध ०८संस्थांच्या माध्यामातून जाळे विनणारे सहकार महर्षी स्व गिरधरशेठ भंगाळे यांच्या १५ व्या पुण्यतीथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच सुभाष महाराज पाटील,मससाका चे माजी संचालक चत्रभुज खाचने, किसान सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद बोंडे यांनी मनोगते व्यक्त केली.

तर कार्यक्रमास प्रमुळं उपस्थिती म्हणून किसान सोसायटीचे माजी चेअरमन कडू भंगाळे,दगडू भारंबे,कृषी विद्यालयाचे प्राचार्य एम टी बोंडे,पितांबर भिरुड,विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे,दत्तात्रय पवार, गिरधरशेठ भंगाळे यांचे नातू गुणवंत भंगाळे,स्वानंद चे अध्यक्ष गिरीश नेहेते,संचालक रवींद्र भोगे,सचिन चौधरी, प्रमोद भोगे,विजय बोंडे,वासुदेव चौधरी,ग्रा प सदस्य प्रभाकर सोनवणे, यांसह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील कोंडे यांनीं केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या