ना.नितीन गडकरी आज भुसावळात

0

भुसावळ :– लोकसभा निवडणुकीच्या रावेर मतदार क्षेत्रातील भाजप शिवसेना आरपीआय (आठवले गट) शिवसंग्राम, रासपा महायुतिच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ आज भुसावळ येथे दिनांक १६ एप्रिल रोजी सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिक संतोषी माता हॉल येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी सर्व शक्ती केंद्र , जि प सदस्य, प स सदस्य, बूथ  सरपंच नगरसेवक व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सह नागरिकांनी हजारोच्या उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे , सरचिटणीस नारायण कोळी, भालचंद्र पाटील, यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.