ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रचाररॅली ला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

0

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ना गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली शहरात आयोजित केली होती. हा दौरा धरणी चौक पासून सुरुवात केली यांत जनतेने प्रचंड प्रतिसाद देत ना गुलाबराव पाटील यांना विजय होणारच , या रॅली चे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. ही रॅली धरणी चौक, जैन गल्ली भाटिया गल्ली कदर गल्ली लांडगे गल्ली परिहार चौक गुजराथी गल्ली मातोश्री कॉम्प्लेक्स मार्गे कोट बाजार या ठिकाणी समाप्त झाली. या रॅलीत महिला वर्ग ची उपस्थित असल्याने प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, गटनेते पप्पू भावे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, महिला ता प्रमुख अश्विनी भाटिया सर्व नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.