मुंबई । बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पाच वर्षे आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकरणात एन्ट्री करणार असल्याचे संकेत दिले आहे. यावरून विरोधक सडकून टीका करत आहेत. नेमका हाच सूर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील लावला आहे. जर पोलिसांमध्येच पक्ष असेल तर या देशाचे काय होणार ? असा खडा सवाल करत त्यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर हल्लाबोल केला.
गुप्तेश्वर पांडे हे पहिल्यापासूनच ज्या पध्दतीत बोलत होते ते संशयास्पदच होते. अगदी साधा हवलदार देखील एक वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेत नसतांना डीजीपी पदावरील एखादा व्यक्ती पाच वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याची बाब संशयास्पद आहे. आधी गावात, खेड्यांमध्ये वा वाड्या-वस्त्यांमध्ये पक्ष होते…आता पोलिसांमध्येच पक्ष असेल तर या देशाचे काय होणार ? असा खडा सवाल करत त्यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर हल्लाबोल केला.