ना.गिरीश महाजन यांची जळगावच्या पालकमंत्री पदी नियुक्ती

0

जळगाव :-  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जळगावच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पदही कायम ठेवण्यात आले आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे  पुण्याचे पालकमंत्र्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगावचे पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र त्यांना जिल्ह्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याची ओरड होत होती. या पार्श्‍वभूमिवर, आज जळगावच्या पालकमंत्रीपदी ना. गिरीशभाऊ महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून चंद्रकांत पाटील यांना पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुन्हा रंगली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.