… नाहीतर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करू देणार नाही- आरपीआयचा इशारा (व्हिडिओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यावर असलेल्या गंभीर स्वरूपातील गुन्हे लक्षात घेता त्यांना मिळालेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात येवून त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण पुकारले आहे.

व्हिडीओ बातमी👇

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी मागण्या केल्या आहेत की, यात सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यावर असलेल्या गंभीर स्वरूपातील गुन्हे लक्षात घेता त्यांना मिळालेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे. गुप्ता यांना जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात यावे. गुप्ता यांनी केलेल्या खोट्या तक्रारीच्या अनुषंगाने गरीब लाभार्थ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे मोफत धान्य वितरीत करण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत.

ह्या मागण्या मान्य झाल्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ध्वजारोहण करू दिले जाणार नाही असा इशारा महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिला आहे.

याप्रसंगी जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, अक्षय मेघे, किरण अडकमोल, रिक्षा युनियनचे नाना अडकमोल, अनिल लोंढे, अल्पसंख्याकचे अमीन शेख, बबलू भालेराव, गणेश पाटील, जीवन पाटील आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.