नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना

0

अध्यक्षपदी प्रा. प्रशांत पाटील तर सचिवपदी प्रा. डॉ. जी. आर. वाणी, आणि उपाध्यक्षपदी प्रा.चंद्रकांत सरोदे यांची निवड

भुसावळ | प्रतिनिधी 

येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना झाली असुन अध्यक्षपदी प्रा. प्रशांत विजय पाटील तर सचिवपदी प्रा. डॉ. गजेंद्र रामदास वाणी आणि उपाध्यक्षपदी प्रा.चंद्रकांत हेमचंद्र सरोदे यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. त्यात सहसचिव – जय रामकृष्णा काशिव, कोषाध्यक्ष – प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील, सहकोषाध्यक्ष – आशिष विष्णु चौधरी, सभासद – प्रा. दीपक नामदेव पाटील, प्रा. अजय उत्तमराव सुरवाडे, अजय एकनाथ भोळे, संतोष पुंडलिक विनंते, प्रा. डॉ. गौरी मिलिंद पाटील, प्रा. स्वाती शंकर शेळके, प्रा. स्मिता नामदेव बेंडाळे अशी असुन सर्व नूतन कार्यकारणीचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णु चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे यांनी कौतुक केले आहे. याप्रसंगी भुसावळ तालुका तसेच संपूर्ण परिसरातील नाहाटा महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या नागरीकांनी या संघटनेचे सभासद व्हावे. सभासद होण्यासाठी  प्रा. प्रशांत पाटील मो. नं. ९८२२७८७९३३, आणि प्रा. हर्षल पाटील मो. नं. ८९७५११४२०५ यांचेशी संपर्क साधावा. तसेच महाविद्यालयाच्या वेबसाईट वर नोंदणी अर्ज उपलब्ध आहे तरी कृपया आपली नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.