नारीशक्ती गृप व रोटरी क्लबतर्फे सुकामेव्याचे लाडू वाटप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहर महापालिका व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत नारीशक्ती गृप जळगाव व रोटरी क्लबच्या वतीने आणि आदित्य ढवळे पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२१ सप्टेंबर रोजी शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे ८ लाभार्थ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले होते.

या सर्व मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना व सर्व आजी-आजोबांना नारीशक्ती गृप जळगाव वतीने सुकामेवाचे लाडू महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन, नारीशक्ती गृप अध्यक्षा मनिषाताई पाटील, सुमित्रा पाटील, ॲड. सिमा जाधव, नूतन तासखेडकर, आशा चौधरी, मनोज कुलकर्णी, राजेंद्र मराठे यांच्यासह ज्योती राणे, भावना चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.