मुंबई :- कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी बंगळुरहून आलेले डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
कर्नाटकाती बंडखोर आमदार मुंबईतील एका रनेसाँ हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. काँग्रेस-जेडीएस आमदारांची भेट घेण्यासाठी आज डी के शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झाले होते. मात्र डी के शिवकुमार बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या आवारात दाखल होताच त्यांना मुंबईतील पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे बंगळुराता गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस नेत्यांना राजभवनजवळ निषेध करताना अटक करण्यात आली आहे. या सर्व घडमोडीची पोलिसांना कल्पना होती त्यामुळे हॉटेल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनी या परिसरात संचार बंदी देखील लागू केली होती.