मुक्ताईनगर (वार्ताहर) – तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याने शेतीच्या सततच्या नापिकीमुळे तसेच घेतलेल्या कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 25 रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील पोलीस पाटील दशरथ बाबुराव चौधरी वय 36 वर्षे यांनी पोलिसात दिलेल्या खबरी नुसार , राजू आसाराम घोगरे वय 42 वर्षे हे निमखेडी खुर्द येथील शेतकरी असून स्वतःच्या शेतीच्या नापिकीमुळे तसेच त्यांनी घराच्या बांधकामासाठी तसेच शेतीसाठी काही कर्ज घेतले होते . या घेतलेल्या कर्जास कंटाळून राजू घोगरे यांनी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि. 25 रोजी रात्री नऊ वाजता घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले व एक भाऊ असा परिवार आहे.