तळेगाव, ता.जामनेर (प्रतिनिधी) : येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात प्राथमिक अंदाजानुसार विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रभाकर गणपत डोळसे (वय ४२) असे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी,आई असा परिवार असून त्यांच्यावरती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व त्यानंतर आलेली कपाशी सुद्धा कमी भावात विकावे लागले. त्यामुळे कर्जबाजारी झालेले व नापिकीला कंटाळलेले प्रभाकर गोडसे यांनी शेवटी मृत्युला कंवटाळले आत्महत्या केली. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत असून संजय पाटील रामदास कुंभार राहुल पाटील आदी सहकार्य करीत आहेत.