जळगाव :- बारावी परीक्षेत नापास झाल्याने नैराश्य येऊन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील शिरसोली येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उज्ज्वला भगवान अस्वार (२१) असे या तरुणीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उज्ज्वला अस्वार हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. मात्र ती नापास झाल्याने तिला मानसिक धक्का बसला व तिला नैराश्य आले होते. आज सकाळी तिचे आई वडील शेतात कामासाठी निघून गेल्यानंतर घरात कुणीही नसताना तिने सऱ्याला दोरी बांधू गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ स्वप्नील हा कामावरून घरी आला असता त्याला हा प्रकार दिसल्याने त्याने एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तापास पोकॉ राठोड करीत आहे.