जळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून मनपाच्या कचरा संकलित करणारी 18 वाहने ही नादुरुस्त अवस्थेत धूळखात पडले आहे. यामुळे कचरा संकलित करण्यास अडथळे येत आहेत. बंद असलेल्या या वाहनांमुळे नगरसेवकांसह नागरिकांच्या वाहनांविषयी तक्रारी वाढल्या आहेत. तरी ही नादुरुस्त वाहने त्वरित दुरुस्त करण्यात यावीत, असे पत्रकाद्वारे मागणी मुख्य आरोग्य निरीक्षकांनी आयुक्तांकडे केली आहे.
मनपा आरोग्य विभागाची एक एक करता तब्बल 18 वाहने आजमितीस नादुरुस्त अवस्थेत आहेत. यामुळे नागरिक तसेच नगरसेवकांच्याही तक्रारी वाढल्या आहेत. बंद असलेली वाहने एमएच 19 एम 9347 स्किप लोडर (16 महिन्यापासून बंद), एमएच 19 एम 9212 कॉम्पॅक्टर (7 महिने), तर खालील वाहने ही 1, 2 महिन्यात बंद झालेली आहेत.
एमएच 19 एम 9118 कॉम्पॅक्टर, एमएच 19 एम 9086 घंटागाडी, एमएच 19 एम 366 स्किप लोडर, एमएच 19 एम 9087 घंटागाडी (हॉटेल वेस्ट), एमएच 19 एम 852 ट्रॅक्टर लोडर, एमएच 19 एम 9206 घंटागाडी, एमएच 19 एम 9098 घंटागाडी, एमएच 19 एम 9204 घंटागाडी, एमएच 19 एम 9377 टिप्पर, एमएच 19 एम 853 ट्रॅक्टर लोडर,, एमएच 19 एम 9103 घंटागाडी, एमएच 19 एम 362 स्किप लोडर, एमएच 19 एम 9378 टिप्पर, एमएच 19 एम 9194 घंटागाडी, एमएच 19 एम 9099 घंटागाडी, एमएच 19 एम 9104 कॉम्पक्टर ही वाहने विविध कारणांमुळे नादुरुस्त झालेली आहेत. तरी ही नादुरुस्त वाहने त्वरित दुरुस्त करण्यात यावीत याविषयी मुख्य आरोग्य निरीक्षकांनी मागणी केली आहे.