नाथाभाऊ गेले तर काय झालं, आमदार, खासदार सोडा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही ; गिरीश महाजन

0

चोपडा : भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष मोठा झाला आहे. नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी, आमदार, खासदार सोडा, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.  चोपडा येथील भाजपच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक विजय पुराणिक होते. या वेळी वक्त्यांनी चोपड्यातील भाजपच्या यशाला स्व. उत्तमराव पाटील, स्व. माधवराव चौधरी यांच्या विजयापासून मोठी परंपरा असल्याचे सांगून पक्षनिष्ठांची मांदियाळी असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपला सातत्याने भरघोस मते मिळत असतात.

 

जनतेचे भाजप विचारसरणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचे देखील वक्ते म्हणाले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, ॲड. किशोर काळकर, रवींद्र अनासपुरे, विजय धांडे, सचिन पानपाटील, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती ज्योती पाटील, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे आदी उपस्‍थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.