नाथाभाऊ खडसे उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये : चर्चेला उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुण्यातील भोसरी भूखंड व्यवहार प्रकरणी खडसे हे ईडीच्या रडारवर आहेत. पुढील चौकशीच्या आधीच उपचारासाठी खडसे हॉस्पिटलमध्ये अचानक दाखल झाले त्यामुळे आता सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे कि, ईडीची पुढील चौकशी टाळण्यासाठी हा प्रकार केला जातोय का?

खडसे यांनी ईडीच्या चौकशीसाठी एक वेळेस हजेरी लावल्यानंतर ते जळगाव जिल्ह्यात आले होते, तसेच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. यानंतर मात्र ते मुंबईत असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबत खडसे आणि निकटवर्तीय यांचेशी संपर्क साधला असता बॉम्बे रुग्णालयात खडसे यांचेवर उपचार सुरू असल्याचा दुजोरा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.