Saturday, December 3, 2022

नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा टळला

- Advertisement -

जळगाव दि. 10-

- Advertisement -

दीप आमावस्येच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण होणार्‍या राजे संभाजी नाट्यगृहाचा मुहूर्त पुन्हा टळला आहे. या नाटयगृहाच्या लोकार्पणासाठी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील येणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना जळगाव दौरा रद्द करावा लागला असल्याने नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पुन्हा खो बसला आहे.
शहरात नवीन निर्माण झालेल्या राजे संभाजी नाट्यगृह गेल्या 1 जानेवारीपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नाट्यगृहाच्या लोकार्पणासाठी प्रशासनाने दीप अमावस्येचा मुहुर्त शोधला होता. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. त्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी नाट्यगृहाची पहाणी देखील आटोपली होती. लोकार्पण सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे जोरदार तयारी केली जात होती. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटलांनी जळगाव दौरा आखला होता. प्रशासनातर्फे पालकमंत्र्यांच्या दौर्‍याचे नियोजन चालू होते. जवळजवळ नियोजन पुर्ण झाले होते. आणि तेवढ्यात अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र राज्याचा दौर्‍यावर येत आहेत त्यामुळे ना. चंद्रकांत पाटील यांनी आपला जळगाव दौरा तातडीने रद्द केला आहे. नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पुन्हा एकदा खोडा बसला आहे. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिक कलाकार यांच्यात पुन्हा तीव्र नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या