चोपडा | प्रतिनिधी
तालुक्यातील नागलवाडी गावात व परिसरात मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने संपुर्ण नदी नाले बंधारे ओथंबुन वाहत होते . वरुण राजाच्या उपकाराची जाणिव ठेवत आलेल्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले .
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी. यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले . नागलवाडी गावात चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांची पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रष्ट , अखिल भारतीय जैन संघटना , महाराणा प्रताप नागरी पतसंस्था व नागलवाडी ग्रामस्त यांच्या वतीने नाला खोलीकरण केलेल्या बंधारयाचे जलपुजन करुन त्या बंधारयास नागलवाडी गावाचे वैभव असलेले कर्मयोगी दानशुर स्व हुकुमसिंग झेंडु राजपुत यांचे नामकरण म्हणुन करण्यात आले .
स्व हुकुमसिंग झेंडु राजपुत हे तालुक्यात सुप्रसिद्ध असे एक व्यक्तीमत्व होते .त्यांनी कधीही जात पात न पाहता गोरगरीब गरजु लोकांची रात्री अपरात्री मदत करत असत . त्याकाळी गावात डाँक्टर नव्हते त्यावेळी हुकूमसिंग राजपूत हे रोज संध्याकाळी स्वखर्चाने औषद रूग्णांना मोफत वाटप करत असत . गावात ओला सुका दुष्काळात गरीबांना धान्य वाटप करत असत . गावात आलेले साधु संत , कलाकार , शासकीय अधिकारी नाना कडे नेहमी येण जाण असायच त्यांना देखील खाली हात जाऊ देत नव्हते . त्यांच्या कार्याचा गावाला विसर पडु नये व येणार्या पिढीला प्रेरणा प्रोहत्साहन मिळावे यासाठी या कर्मयोगीचे नाव देण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे .
नंतर बोरअजंटी वराड रस्त्यालगत , डाँ नरेंद्र शिरसाठ, यशवंत पाटील, सुलताने व शेतकरी मिळुन केलेल्या माती बांधचे देखील जलपुजन करण्यात आले.