नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सखी श्रावणी संस्थेतर्फे निवेदन

0

भुसावळ (प्रतिनिधी) : नागरीकता संशोधन विधेयक बहुमताने पारीत झाले आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय येथे शिरस्तेदार  यांना निवेदन सादर करण्‍यात आले.

या निवेदनात म्‍हटले आहे की , कायद्याचे सर्वत्र  स्वागत केले जात असतांना काही लोकांकडून कायद्‍याच्या विरोधात जावून देशात अराजकता माजविण्याचे काम काही संघटना करीत आहे. अर्धवट व चुकीची माहिती पसरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. हिंसाचार पसरविणार्‍या व्यक्ती व संघटनावर योग्य ती चौकशी करुन गुन्हे नोंद करावे व कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी  करण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या संस्थापिका राजश्री नेवे, माया चौधरी,उज्वला बागुल, वंदना झांबरे,अनुराधा टाक, स्मिता माहुरकर,राधिका वाणी, वैशाली सोनार,शशिकला शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.